मुंबई/प्रतिनिधी
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करून या प्रकऱणात त्यांना अटक करण्यात आली होती. सचिन वाझेने मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी का सोडली याचा तपास एनआयए करत होती. आता सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवली याची माहिती दिली आहे.
दरम्यान, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने कोर्टात तब्बल दहा हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवलं त्याची कारणंही मिळाली आहेत.
सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती म्हणून त्याने हा सर्व केल्याचं उघडकीस आलं आहे. दरम्यान, यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवलं त्याची कारणं मिळाली आहेत. सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांच्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळेल, अशी आशा सचिन वाझेला होती, मात्र इथेच तो फसला आणि जेलमध्ये गेला.