अरुणाचलच्या भागावर चिनी ड्रनगची दावेदारी, मुलाच्या अपहरणालाही ठरवले ‘बेकायदेशीर घुसखोरी’
बीजिंग / वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेशात 17 वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱया चिनी ड्रगनने आता या घटनेला ‘बेकायदेशीर घुसखोरी’ असे ठरवत भारताला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच झांगनान (अरुणाचल प्रदेश) हा शिजांगचा दक्षिण भाग असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मुलाच्या अपहरणाच्या घटनेची कबुली देण्याऐवजी चीनचे सैन्य पीएलए कायद्यानुसार बेकायदेशीर प्रवेश आणि निर्गमन नियंत्रित करण्यासाठी कारवाई करते, असेही स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, भारतीय लष्करानेही चिनी लष्कराशी संपर्क साधून मुलाचा शोध चालू ठेवला असून परिसरात शोधकार्य तीव्र केले आहे. तसेच लष्करी पातळीवर चिनी सैन्याशी बोलणी सुरू ठेवली आहेत.
अरुणाचल प्रदेशातील भारताच्या बेकायदेशीर अतिक्रमणाला चीनचा नेहमीच विरोध आहे. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा भाष्य करताना झांगनान (अरुणाचल) हा शिजांगचा दक्षिण भाग असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तसेच चीनने भारतीय नागरिकाचे अपहरण केल्याचे अजूनही उघडपणे मान्य केलेले नाही. अरुणाचल प्रदेशातून 17 वषीय भारतीय मुलाचे अपहरण झाल्याबद्दल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची माहिती नसल्याचे यापूर्वी सांगितले होते. मात्र, अरुणाचलमधील भाजप खासदाराने गुरुवारीच पीएलएने राज्यातील भारतीय हद्दीतील अप्पर सियांग जिह्यातून एका 17 वषीय मुलाचे अपहरण झाल्याची माहिती दिली होती. अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मिराम तारोन असे आहे.