प्रतिनिधी / म्हसवड
म्हसवड नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी गटाच्या उपनगराध्यक्षा स्नेहलमाई युवराज सुर्यवंशी यांनी गुरुवार दिनांक 21 जानेवारी रोजी परिवर्तन पॅनेलच्या प्रमुख मान्यवरांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पिठाशीन अधिकारी तथा नगराध्यक्ष तुषार विरकर पालिकेत अनुपस्थित राहिल्याने तो राजीनामा मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांचेकडे देण्यात आला.
यावेळी अजितराव राजेमाने, नगरसेवक शहाजी लोखंडे, अकिल काझी, अनिल माने, माजी नगरसेवक बाळासाहेब राजेमाने, चेअरमन तेजसिंह राजेमाने, सुर्यवंशी, मंगल कोके, बाळासाहेब माने, युवराज सुर्यवंशी, बाबासाहेब माने, राजेंद्र माने, कैलास भोरे, प्रदिप तावरे, डॉ. राजेश शहा, अरुण मुकीरे, उत्तम शिंदे, शिवसेनेचे राहुल मंगरुळे, आरपीआयचे किशोर सोनवणे, विजय बनगर, राष्ट्रवादी पक्षाच्या माण खटाव विधानसभा अध्यक्ष डॉ. संदिपदादा पोळ, सुभाष नरळेसह शेकडो युवराज सुर्यवंशी समर्थक यावेळी उपस्थित होते.
उपनगराध्यक्षांनी राजीनामा देतेवेळी उपस्थित पालिका कर्मचाऱयांना त्याचे आश्रू लपवता आले नसल्याने पालिका परिसर गहिवरुन गेलेला दिसत होता. या राजीनाम्यानंतर या पदासाठी इच्छुक असलेल्या धनाजी माने यांचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या या निर्णयावर बोलवलेली बैठक नगराध्यक्ष विरकर रद्द करणार का ? या बाबत आज उलटसुलट चर्चा सुरु होती.
दोन दिवसांपुर्वी पालिकेच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उपनगराध्यक्ष असलेल्या स्नेहलमाई सुर्यवंशी यांनी राजीनामा द्यावा. यासाठी राष्ट्रवादी पक्षातील काही नगरसेवकांनी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाचे सात नगरसेवक असे दोन्ही बाजुच्या 14 सदस्यांनी सह्याचे निवेदन नगराध्यक्ष तुषार विरकर यांचेकडे अविश्वास ठरावाचे निवेदन दिले होते. त्यानंतर दुसऱया दिवशी आपन राजीनामा देणार आहे, तरी सर्व नगरसेवकांनी पालिकेत उपस्थित राहण्याबाबत आव्हान सुर्यवंशी यांनी केले होते. मात्र अविश्वास ठराव दाखला करण्यासाठी अध्यक्षासह ज्यांनी ज्यांनी त्या निववेदनावर सह्या केल्या होत्या, त्यापैकी एकच नगरसेवक उपस्थित होते. बाकीचे सह्या करणारे कोणी राजीनामा देतेवेळी उपस्थित नव्हते.
राजीनामा दिल्यानंतर पत्रकाराशी बोलताना उपनगराध्यक्षा सौ सुर्यवंशी म्हणाल्या, चार वर्षात म्हसवडकर जनतेसाठी व पालिकेच्या हितासाठी कोटय़ावधीची निधी खर्च टाकला आहे. पालिका फंडातील, शासकीय, मंत्री, आमदार, खासदार, स्थानिक विकास निधी, विविध सचिवामार्फेत विकास कामे मंजूर करुन त्यावर 15 ते 16 कोटी रुपये खर्ची टाकण्यात आले. म्हसवड शहरातील मेन पेठ, महात्मा फुले चौक ते छ. शिवाजी महाराज चौक, नाथ मंदिर ते मरिमाता या रस्त्याची कामासह शहरातील गल्ली बोळातील रस्ते गटारीची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.
चौकट
पालिकेच्या उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी यांना यांच्याच गटातील राष्ट्रवादी पक्षाच्या सत्ताधारी व आमदार गोरे गटाने एकत्र येवून सौ सुर्यवंशी यांचे विरोधात बंड पुकारुन अविश्वास दाखला केला. सुर्यवंशी यांना शह दिला तर या शहला सौ सुर्यवंशी यांनी अविश्वासाच्या बैठकी आधिच आपल्या उपनगाराध्यक्ष पदाचा राजीनामा हजारो म्हसवडकर नागरीकांच्या उपस्थीत देवून आमदार गटाला व सत्ताधारी गटाला प्रतिशह दिल्याची चर्चा मात्र दिवसभर सुरु होती. 2) उपनगाराध्यक्षा सौ सुर्यवंशी या आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी पालिकेत आल्या त्यावेळी उपस्थीत असलेल्या कामगारांच्या डोळ्यात पाणी आले तर काही आकक्षरशा ओकसा बोकशी रडताना दिसत होते तर राजीनामा देताना सहाशे ते आठशे सुर्यवंशी समर्थक पालिकेत उपस्थीत राहिल्याने पदग्रहण आहे की राजीनामा अशी चर्चा नागरीको करत होते