कलावती पुकळे होणार उपनगराध्यक्षा
प्रतिनिधी/ म्हसवड
म्हसवड पालिकेचे तिसरे उपनगराध्यक्ष दीपक बनगर यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे. त्यामुळे उपनगराध्याक्ष पदासाठी इच्छूक असलेल्याला कलावती सुरेश पुकळे (शेंबडेवस्ती) यांना संधी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत. म्हसवड पालिकेच्या पहिल्या उपनगराध्यक्षा म्हणून स्नेहल सुर्यवंशी, दुसरे उपनगराध्यक्ष धनाजी माने, तिसरे दीपक बनगर तर चौथे उपनगराध्याक्ष कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तरी या पदावर उपनगराध्याक्ष म्हणून कलावती पुकळे यांना संधी मिळणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे