प्रतिनिधी/ म्हसवड
म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षपदी सत्ताधारी परिवर्तन पॅनेलच्या नगरसेविका सविता राहूल म्हैत्रे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
म्हसवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाचा दोन दिवसांपुर्वी कलावती पुकळे यांनी राजीनामा दिला. थ्यामुळे रिक्त उपनगराध्यक्ष पदावर उर्वरीत पाच महिण्याच्या कालावधीसाठी कोणाला संधी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. याविषयी काल सत्ताधारी परिवर्तन पॅनेलच्या नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, धनाजी माने पृथ्वीराज राजेमाने, राहुल म्हेत्रे, सुरेश पुकळे, शहाजी लोखंडे, अनिल माने यांनी बैठक घेऊन उपनगराध्यक्ष म्हणून सविता म्हैत्रे यांचे नाव एकमताने पुढे आल्यावर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. आज दुपारी बारा वाजता पालिकेच्या झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांनी उपाध्यक्षपदी सविता म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे पालिकेच्या समोर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. संधी देण्यासाठी कलाबाई पुकळे यांनी पालिका उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सौ. म्हेत्रे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व सत्ताधारी गटाचे पालिकेतील परिवर्तन नगरसेवक उपस्थित होते.