हरिनामाच्या गजराने वाळपई शहर दुमदुमले
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील म्हाऊस गावातील म्हाळसाई देवीचा पंचगव्य होम धार्मिक कार्यक्रम व व पुरावत्तश्वर देवाचा शिखर कलश स्थापना उत्सव कालपासून सुरुवात झालेली आहे.तीन दिवसात सोहळय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात भाविक भाग घेणार असून कलश मिरवणूक मोठय़ा उत्साहात वाळपई शहरातून काढण्यात आली.
यामुळे वाळपई शहराला अक्षरशः उत्सवाचे स्वरूप आले होते. हनुमान मंदिराकडून या कलश मिरवणुकीला सुरुवात झाली. यामध्ये मोठय़ा प्रमाणात दिंडी पथकांनी व भाविकांनी भाग घेतला होता.
पूर्णपणे पारंपारिक वेशभूषेमध्ये हा सोहळा नेत्रदीपक पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. म्हाऊस गावातील म्हाळसाई देवीचा पंचतत्व होम व पुरावतेश्ववर देवाचा कलश स्थापन सोहळा तीन दिवस चालणार आहे. कालपासून याची सुरुवात झालेली आहे .गेल्या काही दिवसापासून त्याची पूर्वतयारी करण्याच्यादृष्टीने गावातील भाविक व नागरिक काम करत होते. कालपासून या कलश स्थापना सोहळय़ाला सुरुवात झाली .दरम्यान चार दिवसांपूर्वी नवीन कलश आणून वाळपई हनुमान मंदिरामध्ये आणून ठेवण्यात आला होता.
वाजत गाजत कलश मिरवणूक नेत्रदीपक.
वाळपई हनुमान मंदिराकडून आज कलश मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये म्हाऊस हिवरे सालेली सावर्डे केरी व इतर गावातील भाविकांनी मोठय़ा प्रमाणात भाग घेतला होता. वाळपई शहरातून अनेक पथकाने दि?डय़ा काढून या मिरवणुकीला एक वेगळय़ा प्रकारचा रंग देण्याचा प्रयत्न केला. वाळपई शहरांमध्ये अशा प्रकारचा सोहळा नेत्रदीपक
पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता . यामध्ये वाळपई हनुमान देवस्थानाचे योगदान महत्त्वाच्या आहे. काल सुरुवातीला कलश पूजन करून मंत्र घोषात यांची मिरवणूक सुरुवात झाली .यामध्ये मोठय़ा प्रमाणात भाविकानी भाग घेतला होता. खास करून महिला भगिनी पूर्णपणे पारंपरिक वेष परिधान केला होता. हरिनामाचा गजर व विठ्ठलाचा जयघोष करीत ही मिरवणूक हनुमान मंदिराकडून म्हाऊस रस्त्यावरून रात्री उशिरा देवस्थानच्या प्रांगणात पोहोचणार आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात भाविक भाग घेणार आहेत. त्यानंतर शनिवारपासून धार्मिक पूजेला सुरुवात होणार असल्याची माहिती ग्रामस्था?नी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराचे कलश स्थापना करण्याचा अनेकांचा मनोदय होता . सर्व ग्रामस्थांच्या व भाविकांच्या एक विचाराने हा सोहळा नेत्रदीपक पद्धतीने सुरुवात होत असल्याबद्दल या भागातील भाविक ग्रामस्थ व या देवस्थानाची संलग्नित असलेल्या भाविकांना एक अभूतपूर्व सोहळा असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे .म्हाऊस गावासाठी हा आनंदाचा सोहळा आहे. त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्मयाच्या अनेक गावातील मंडळी तीन दिवसांमध्ये हजारोच्या संख्येने या सोहळय़ामध्ये सहभागी होणार असून तीन दिवस महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
शनिवार 12 रोजी सकाळी 9 ते 12 वा. प्रायश्चित, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण, प्राकार शुध्दी, देवता स्थापना, कलश संप्रोक्षण स्थापना, अग्नी स्थापना, संध्या निमंत्रित कलाकारांचे भजन, स्वर कला भजनी मंडळ पाली सत्तरी. (पुरस्कृत देविदास रघुनाथ गावकर व कुटुंबीय म्हाऊस), रात्रौ 9.15 ते 11.15 वा. स्थानिक कलाकारांची घुमट आरती.
रविवार 13 रोजी सकाळी 8.30 वा. प्राकार शुध्दी, सकाळी 10.32 वा. शिखर कलश स्थापना, सकाळी 11 ते गुपारी 1 वा. लघुरुद्र स्वाहाकार वली पूर्णाहुती, अभिषेक, आरती, प्रार्थना, ब्राह्मण संतर्पण, दुपारी 1.30 वा. महाप्रसाद, संध्या. 7 ते 9 पर्यंत कीर्तन, (पुरस्कृकर्ते सुभद्रा टेडर्स म्हाऊस. प्रोपा. दत्ता गावस झर्मे,), रात्रौ 9 ते 11 वा. स्थानिक कलाकारांचे भजन. सोमवार 14 रोजी सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, व कथा तद्नंतर तीर्थप्रसाद, (यजमान सौ.व श्री. बारकेलो गावकर व सौ. व श्री भिको गावकर), दुपारी 1.30 वा. महाप्रसाद, संध्या 5 ते 7 वा. स्थानिक महिला मंडळाचा फुगडी कार्यक्रम, संध्या 7 ते 9 वा. गोमंतकातील नामवंत कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम. (पुरस्कृतकर्ते – पत्रकार उदय सावंत, कल्पेश गावस, देविदास गावकर). रात्री 10 वा. श्री अष्टविनायक दशावतारी नाटय़ मंडळ निरवडे सावंतवाडी यांचा दशावतारी नाटय़प्रयोग. यावेळी भाविकांनी मोठय़ा संख्येनी उपस्थित राहून महोत्सवात कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा, असे देवस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे.