प्रतिनिधी / म्हापसा
उत्तर गोव्यातील विविध भागातुन आपल्या राज्यात पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तसेच पोलिसांकडून म्हापशातील पेडे येथील क्रीडा -मैदानात कॉरोन्टाईन केलेल्या परप्रांतीय मजुर लोकांनी रविवारी सकाळी बराच धांगड धिंगाणा घात ला . यावेळी अनेकांनी मैदान सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्थानिक पोलिसांना पाचारण करावे लागले.
दरम्यान, घटनास्थळी बार्देशचे मामलतदार तसेच उप-जिल्हाधिकार्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मजुरांची समजुत काढली. दरम्यान, गेल्या पंचवीस मार्चपासून राज्यात लागुं करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाश्वभुमीवर गोव्यात आपली उपासमार होत असल्याचे कारण पुढे करीत अनेक मजुरांनी आडवाटेने आपल्या गांवचा रस्ता धरला असतां स्थानिक पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेत म्हापशाच्या पेडे येथील क्रिडा प्राधिकरणाच्या जागेत कॉरोन्टाईन करून ठेवण्यात आले होते, दरम्यानच्या काळात युपी, बिहारी मजुरापैकी राज्याच्या विविध भागात भाडेकरूं म्हणून राहाणार्या अनेकांना स्थानिक लोकांकडून घर सोडण्याचा तगादा लालल्यामुळे इथे आड तेथे विहीर अशी नामुष्की ओढवलेल्या अनेकांनी सरकारी कायद्याचा भंग करीत मिळेल त्या मार्गाने राज्याच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक पोलिसांपुढे त्यांना ताब्यात घेण्यापासून दुसरा पर्याय नव्हता. दरम्यान, अशाच प्रकारे गावी जाण्याच्या प्रयत्नात असतांना गेले दोन ते तीन दिवस उत्तर गोव्यातील पत्रादेवी सीमेवर शेकडों युपी-बिहारिंना ताब्यात घेत त्यांना म्हापशाच्या पेडे येथील केद्रात कॉरोन्टाईन करण्यात आले होते.
याजागी त्यांची खाणाजेवणांपासून ते योगसाधना करण्याबरोबरच जेवणांखाणाची मोफत सोय करण्यात आली होती तथापि, लॉकडाऊनच्या पाश्वभुमीवर स्वताच्या जीवनालाच कंटाळलेल्या शेकडों मजुरांनी आम्हांला तुमचे जेवण नको, ऐश आराम नको , फक्त घरी जाऊं द्या असा आक्रोश करीत पेडेतील मैदानाच्या मुख्य दरवाजापर्यत येत बराच वेळ गोंधळ घातला. दरम्यान, परिस्थितीचा अंदाज घेत केद्रातील अधिकार्यांनी स्थानिक पोलिसांना तात्काळ घटनास्थळी बोलावून घेतल्याने बाका प्रसंग टळला