प्रतिनिधी / म्हापसा
येथील तारी नदीपात्रात खुबे काढण्यासाठी उतरलेल्या पुरुषोत्तम प्रकाश सातार्डेकर (वय 23) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. मयत पुरुषोत्तम हा बोविस्ता उसकई पालये येथील रविवासी असून तो पहाटे आपल्या पाच मित्रांसोबत खुबे काढण्यासाठी तारी नदीच्या पात्रात उतरला होता. यावेळी पुरुषोत्तम अचानक खोल पाण्यात गेला व गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार पाहूण त्याच्यासोबत असणाऱयांनी आरडोओरड सुरू केली मात्र तोपर्यंत पुरुषोत्तम पाण्यात बुडला होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. म्हापसा अग्नीशमन दलाच्या जवानांनी होडीच्या साहाय्याने मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील रुग्णालयात पाठविला.