प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा नववर्ष स्वगत समीती आयोजित 19 वा सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव शनिवार दि. 2 एप्रिल रोजी म्हापसा टॅक्सी स्थानकावर साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजन समितीचे प्रमुख मार्गदश्&क प्रा. अनिल सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. 2 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता खोर्ली येथील श्री देवी सातेरी मंदिरात नारळ ठेवून व सार्वजनिक गाऱहाणे घालून शोभा यात्रेला सुरवात होईल. तसेच करासवाडा, दत्तवाडी, गणेशपूरी, आंगड, विठ्ठलवाडी, काणकाबांध, घाटेश्वर नगर, शेटय़ेवाडा, धुळेर आदी भागातून शोभायात्रेला प्रारंभ होवून सकाळी 5.30 वाजता सर्व शोभायात्रा मारूती मंदिराजवळ एकत्रित येतील. नंतर तेथून एक भव्या शोभायात्रा शहरातून काढण्यात येईल. यात दिंडी पथक, लेझिम पथक, ढोल पथक, मशाल मिरवणूक, पंचारती घेउढन महिला, हातात भगवे झेंडे घेऊन पुरूष पारंपारिक वेशात सहभागी होतील.
टॅक्सी स्थानकावर सकाळी 6 वाजता ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेशजी सोमण यांच्या हस्ते सार्वजनिक गुढी उभारण्यात येईल. त्यानंतर ‘भारतीय इतिहासाची सेनेरी पाने’ या विषयावर भाषण होईल, अशी माहिती प्रा. सामंत यांनी दिली.
सायंकाळी 6.30 वाजता माहिती आणि प्रसिध्दी खाते पुरस्कृत व विष्णू †िशरोडकर निर्मित ‘स्वर-वंदन’ हा भावगीत, भक्तीगीत, नाटय़गीत व देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफ्ढल होणार आहे. यात गायक कलाकार प्रसन्न प्रभु तेंडूलकर, समृध्द चोडणकर, तनिशा मावजेकर, वादक कलाकार रोहित बांदोडकर, प्रकाश आमोणकर, अवधूत च्यारी, सुशीलकुमार द्विवेदी व विष्णू †िशरोडकर भाग घेणार आहेत. मानसी वाळवे सूत्रसंचालन करतील.
उत्सव समिती पुढील प्रमाणे. अध्यक्ष- वैभव राऊळ, उपाध्यक्ष- प्राची साळगावकर, अमय नाटेकर, कार्यवाह- कौस्तुभ राऊत, सदस्य- अंजिता भगत, संदीप गावस, कुणाल धारगळकर, शुभम पार्सेकर, बादल कारेकर, शुभम पेडणेकर, सिध्देश दिवकर, दत्ता कारापूरकर, साईली परब, साळवी वारंग, अंतरा नेवगी, भार्गव बर्वे, यशो निसवाणकर, रिषभ गडेकर, धृव मेनन, समृध्दी वायंगणकर, गणेश पिळर्णकर.