सर्वासमक्ष मारहाणही केली
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा हॉटेल सत्यहिराजवळ आपली डय़ुटी बजावित असताना म्हापसा ट्राफिक पोलीस शिपाईने आपल्यावर गाडी मारण्याचा बहाणा करून एका इसमाला व सर्वासमक्ष कानफटीत लावून एका आरोपीप्रमाणे ढकलत त्याच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्या इसमाने आपल्यास सोडा अशी अनेकदा विनंती करूनही तो शिपाई ऐकण्यास तयार नव्हता. उलट उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षकासमवेत त्या शिपाईने त्या इसमाला अडवून दमदाटी केल्याची घटना भर म्हापशात घडली. मिळालेल्या माहितीनुसार हे ट्राफिक पोलीस चुकीच्या दिशेने राहून दंड देत होते आणि अचानक दुचाक्या समोर आल्या की अंगावर धावून जातात. त्यात ब्रेक नसल्याने गाडी लागली तर दुचाकीस्वारांनी मारण्याचा बहाणा करून त्यांच्या अंगावर जातात व नागरिकांना मारहाण करतात असे आढळून आले आहे.
म्हापशात ट्राफिक पोलिसाबाबत सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे. काल ट्राफिक पोलीस शिपाई दुचाकीस्वाराला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले. चोराच्या उलटय़ा बोंबा असा प्रकार काल पोलि,ांकडून घडला. आपण नो पार्किंग स्थळी गाडय़ा पार्क करून दुचाक्यांना दंड देण्यास हे पोलीस माहीर झाले असून काल जो प्रकार घडला तो लाजीरवाणा होता. भर सर्वांच्या समोर त्या ट्राफिक पोलीस शिपाईला दुचाकीवाल्याला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला याबाबत एकच चर्चा सुरू होती. त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याला दंड द्या. पोलिसांना मारहाण करण्याची परवानगी तिही भर गर्दीत कुणी दिली याबाबत चर्चा सुरू आहे. एकतर म्हापशात ट्राफिक पोलिसच आपला कायदा मोडून रस्त्यावर राहतात व नंतर दंड देतात. अनेकदा पोलीस वर्ग छुप्यारित्या आड राहून अचानक दुचाकी आल्यावर मधोमध धावून येतात यामुळे अनेकदा म्हापशात तो गाडी घेऊन येणाऱयांना अपघात झाल्याचे पहायला मिळाले आहे. येथेही हाच प्रकार घडल्याचे बघ्यांनी बोलताना सांगितले. अचानक तो ट्राफिक पोलीस मधोमध आल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. मात्र पोलिसांनी त्याला आरोपी प्रमाणे मारहाण केल्याचा व्हिडीओ पहायला मिळाले. शेवटी त्या दुचाकीस्वाराने त्या पोलिसाच्या तावडीतून कशी बशी आपली सुटका करून धून ठोकली. दहा मिनिटाच्या या एपिसोडमुळे बघ्याना मात्र एक करमणूक झाली. आपल्या वरिष्ठांचे दंडाचे मीटर घेऊन हे पोलीस दंड देतात हे मात्र यातून दिसून आले.