प्रतिनिधी / म्हापसा
गोवा पोलीस खात्यातर्फे मंगळवारी सायंकाळी म्हापशात ‘कोरोना’ या महाभयंकर रोगाबाबत गीत सादर करून जनजागृती करण्यात आली. म्हापसा गांधी चौकामध्ये पोलीस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी ‘ए कोरोना हमको है रोखना, रोखेंगे हम उसे घरपेही रहना’ हे जागृती गीत सादर करून हा महाभयंकर रोग रोखण्यासाठी सर्वांनी घरातच राहावे, असा संदेश दिला. यावेळी पोलीस उपअधीक्षक एडवीन कुलासो, उपअधीक्षक गुरुदास कदम, निरीक्षक उदय नाईक, तुषार लोटलीकर, संदेश चोडणकर, सुदेश नाईक, निनाद देऊलकर, कृष्णा सिनारी, मिलींद मुईंबर, सूरज गावस आदी पोलीस अधिकारीवर्ग उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक उत्कर्षू प्रसन्नूही उपस्थित होते.