प्रतिनिधी /म्हापसा
गुढी पाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समिती म्हापसा आयोजित व माहिती, प्रसिद्धी खाते गोवा सरकार पुरस्कृत ‘स्वर-वंदन’ हा भावगीत, भक्तिगीत, नाटय़गीतांचा सांगीतिक कार्यक्रम म्हापसा टॅक्सीस्थानकावर संपन्न झाला. विष्णू शिरोडकर यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात गायककलाकार प्रसन्न प्रभू तेंडुलकर, समृद्ध चोडणकर, तनिशा मावजेकर यांचा सहभाग होता. त्यांना साथसंगत रोहित बांदोडकर, प्रकाश आमोणकर, अवधूत च्यारी, सुशिलकुमार द्विवेदी यांनी दिली. मानसी वाळवे यांनी संचालन केले.