प्रतिनिधी / म्हापसा
सिने अलंकार येथील श्री राष्ट्रोळी देवाला नमन केल्यावर गाऱहाणे घालून व आमदार जोशुआ डिसोझ यांनी मिरवणुकीला बावटा दाखवून शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धांचा सहभाग होता. चित्ररथ व रोमटामेळातील ढोल ताशांच्या वादनाने म्हापसा नगरी दुमदुमली. रात्री उशिरापर्यंत मिरवणुक सुरू असल्याने चित्ररथांचे देखावे पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.
शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष गुरूदास नाटेकर, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, मुख्याधिकारी सीताकांत सावळ,
प्रदीप कवळेकर, प्रा. रवींद फ्ढाsगेरी, विकास कांबळी, खजिनदार सदानंद शेट नार्वेकर, मोहन काणेकर, आदी उपस्थित होते.
वेशभूषा स्पर्धेत मोठय़ा प्रमाणत बालकलाकार सहभागी झाले होते. भारतमाता, संत नामदेव, मुख्यमंत्री, विठ्ठल रखुमाई व नेत्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. आकर्षक तालगडी नृत्य, गोफ्ढनृत्य, म्हापसा बोडगेश्वर ढोल पथक, मडकई येथील लोकनृत्य आदीं रसिकांचे लक्ष वेधून घेत होते. रात्री सुरू झालेले चित्ररथ लक्षवेधी होते.
320 एमएपी 1, 2, 3, 4, 6, 7