आमदार जोशुआचा पुढाकार : काही पंचायत क्षेत्रातही लॉकडाऊनचा निर्णय
प्रतिनिधी / म्हापसा
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहून आता म्हापशाच्या आमदाराच्या पुढाकाराने म्हापसामध्ये येत्या अन्य दहा दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन सर्वांनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःहून करावा असे आवाहन आमदारांनी केल्यावर सर्वांनी ते मान्य करून म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनीही त्यांना साथ देत म्हापसा बाजारपेठही पुढील दहा दिवस बंद ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान कळंगूट मतदारसंघ पुढील 7 दिवस तर वेर्ला -काणका, पर्रा, आसगाव, पंचायतीनी खास बैठक घेऊन पुढील 10 दिवस पंचायत क्षेत्रात लॉकडाऊन केल्याचे जाहीर केले आहे.
अन्य 10 दिवस कळ सोसा
म्हापशात पहिल्या दिवशी म्हापसा बाजारपेठेत लॉकडाऊन पूर्णपणे बंद झालेले आहे. सर्वांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली आहे. हे सोमवारपर्यंत दुकानदारांनी पाळावे असे आवाहन म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी केले होते. दररोज रुग्ण वाढत आहे. आज 25 नवीन रुग्ण आहे. म्हापशात दहा ठिकाणी लघुक्षेत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाऱयांनी सर्वत्र लक्ष ठेवले आहे. म्हापसा वासियांनी स्वतःहून काळजी घ्यावी. कुटुंबियांची घ्यावी फक्त 3 दिवसांचे लॉकडाऊन आहे. ते अन्य 10 दिवस करावे असे जोशुआ म्हणाले.
सर्वांनी लसीकरण घ्यावे
1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरण सुरू होणार होते ते काही दिवस पुढे ढकलले आहे. 45 वर्षासाठी आझिलो इस्पितळात सुरू आहे तेथे कोविड रुग्ण येणार नाही. सर्वांनी लस घ्यावी. गेल्यावर्षी सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन पुढे गेलो होतो मात्र यंदाही परिस्थिती कठीण आहे.
आमदाराकडून सर्वांचे आभार
म्हापशात गरज भासल्यास कोविड केंद्र सुरू करूया सर्व सरकारी यंत्रणा याबाबत सर्वत्र लक्ष ठेवून आहे. सध्या 3 दिवस लॉकडाऊन आहे ते अन्य 10 दिवस वाढविले. नाहक पॅनिक नको. लोकांनी सांभाळून खरेदी करावी. स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. आम्ही घरी राहिल्यास कोरोना कुठे तरी कमी होईल. म्हापसा वासियांनी सर्व काही बंद ठेवल्याने सर्वजण अभिनंदनास पात्र आहे. बंदीमुळे खूप त्रास होतो हेही आम्हाला माहीत आहे. इंडियन मॅडिकल असोसिएशन 15 दिवसाची मागणी केली आहे मात्र सरकारने लॉकडाऊन करण्यापेक्षा सर्वांनी घरी राहून स्वतःहून काळजी घेतल्यास बरे होईल. रुग्णांची संख्या वाढत आहे तेही कमी करता येईल. म्हापशातील लघुक्षेत्रासाठी निवडणूक जबाबदार म्हणता येणार नाही असे जोशुआ डिसोझा म्हणाले.
म्हापशातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय – आशिष शिरोडकर
वाढत्या कोविडमुळे आणि सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या हेतून म्हापसा व्यापारी संघटनेने 3 दिवस म्हापशातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो आता वाढविण्यास अत्यावश्यक आहे अशी माहिती म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी दिली. ज्या प्रमाणे गोमॅकोत ताण वाढला आयएमए डॉक्टर 15 दिवस लॉकडाऊन करण्यास सांगत असल्यास सरकारने यावर विचार करावा. लॉकडाऊन करायलाच पाहिजे. सरकार म्हणाला अर्थव्यवस्थेवर ताण येईल मात्र कुणावर व्यापारी किंवा इंडस्ट्रीवर येणार. गेल्यावेळी सरकारने आम्हाला काय दिले. गरज भासल्यास सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार आणि भिण्याची गरज नाही हा डायलॉग बाजूला ठेवून भिण्याची गरज आहे हे सिग्नल देत तर ही आम्ही सांखळी तोडू शकणार. आज युवा वर्ग मरत आहे. पर्यटन बाहेर सरत नाही. सर्व लॉकडाऊन होऊन सरकारने रुपरेषा आखावी असे आशिष शिरोडकर म्हणाले. आमदार जोशुआ डिसोझा यांनी अन्य आठ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यास सांगितले आहे. आम्ही त्याचे पालन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आसगाव, वेर्ला काणका, पर्रा, या पंचायतीनी बैठक घेऊन आपल्या पंचायत क्षेत्रातील गावे पुढील 8 ते 10 दिवसासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान नास्नोळा पंचायतीचे पंचसदस्य सतीश गोवेकर यांनी सरपंचांना पत्र पाठवून सध्या सर्वत्र कोविडच्या केसेस वाढत असल्याने नास्नोळा पंचायतक्षेत्र पूर्णतः लॉकडाऊन करावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.