म्हापसा पालिकेच्या पहिल्या खास बैठकीत विविध समित्यांची निवड
प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा नगरपालिकेची नवनिर्वाचित नगरसेवकांची खास बैठक सोमवारी पालिका सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध समित्यांची निवड करण्यात आली. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत म्हापसा बाजारपेठेच्या अध्यक्षपदी विराज बाळू फडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी इतर समित्याही बिनविरोध एकमतानी निवडण्यात आल्या. दरम्यान बैठकीवेळी अपुऱया जागेअभावी फक्त तीनच पत्रकारांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल, असे नगराध्यक्षांनी सूचित केल्याने पत्रकारांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांकडून नगराध्यक्षांचा निषेध
म्हापसा पालिकेच्या बैठकीत फक्त तिघाच पत्रकारांना प्रवेश देण्यात येईल असे नगराध्यक्षांनी नमूद केल्याने अन्य पत्रकारांवर अन्याय झाला असल्याचे म्हणून सर्वच पत्रकारांनी सभागृहाबाहेर येऊन बसणे पसंत केले. दरम्यान बार्देश तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी या नगराध्यक्षांच्या वृत्तीचा निषेध व्यक्त केला आहे. दुसऱयावेळी म्हापसा पालिकेची बैठक अन्य कुठेतरी सभागृहात घ्यावी अशी मागणी पत्रकार गिरीश मांद्रेकर यांनी आमदार जोशुआ डिसोझा यांच्याकडे केली आहे. अन्यथा पालिकेच्या सभागृहातील अलमारी आदी खुर्च्या बाजूला करून तेथे पत्रकारांना बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली जेणेकरून पत्रकार बैठकीचे थेट वृत्तांकन करू शकतील, असे मांद्रेकर यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्षांनी पूर्वीच पत्रकारांना कल्पना द्यायला हवी होती – आनंद भाईडकर
दरम्यान नगरसेवक आनंद भाईडकर यांनी पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. प्रथम नगराध्यक्षांनी आपल्या स्वागतपर भाषणात पत्रकारांचे स्वागत केले व बैठक सुरू झाल्यावर फक्त तीनच पत्रकारांनी आतमध्ये रहावे असे नमूद केल्याने हा पत्रकारांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अन्यथा नगराध्यक्षांनी पूर्वीच याची कल्पना पत्रकारांना द्यायला हवी होती असे आनंद भाईडकर व नगरेसवक तारक आरोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पार्किंग समस्याकडे प्रामुख्याने लक्ष- डॉ. नूतन बिचोलकर
नगरेसवक डॉ. नूतन बिचोलकर यांनी आपली पार्किंग व खुल्या जागा या समितीवर निवड केल्याबद्दल नगराध्यक्षांचे आभार मानले. पार्किंगचा प्रश्न जटील आहे. शिवाय अनेक ठिकाणी खुल्या जागा आहेत. त्याकडे आपण प्रामुख्याने लक्ष देणार असल्याची माहिती डॉ. बिचोलकर यांनी दिली. म्हापशाची पार्किंग समस्या सोडविण्याकडे आपण भर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बेकायदेशीर कामाला सदैव विरोध- सुधीर कांदोळकर
विरोधी नगरेसवकांचे प्रमुख सुधीर कांदोळकर यांनी विविध समित्या निवडल्या त्याबद्दल समाधान व्यक्त केले. ज्या ठिकाणी बेकायदेशीर कामे केली जाईल त्यास आमचा कठोर विरोध असेल असे त्यांनी सांगितले. म्हापशाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्रित झटू असे त्यांनी सांगितले.
म्हापसा बाजारपेठ स्वच्छ व सुंदर ठेवण्याकडे भर- विराज फडके
म्हापसा बाजारपेठेच्या चेअरमनपदी आपली निवड केल्याबद्दल आपण आपल्या सहकार्याचे आभार मनतो असे नवनिर्वाचित अध्यक्ष विराज फडके म्हणाले. म्हापसा बाजारपेठेत तसे अनेक प्रश्न तडीस लावणे गरजेचे आहे. नगराध्यक्ष तसेच म्हापशाचे आमदार यांच्या सहकार्याने म्हापसाचा विकासाचा विकास साधणे गरजेचे आहे. म्हापसाच्या विकासाबाबत आमच्या विविध योजना आहेत त्या पूर्णत्वाकडे नेण्यास आपण प्रयत्न करणार आहे. आणि विशेष म्हणजे म्हापसा बाजारपेठ स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याकडे आपण लक्ष देणार असल्याची माहिती विराज फडके यांनी दिली.
आर्थिक बाबीमुळे भूमीगत वीज वाहिन्याचे काम पडून- आमदार जोशुआ डिसोझा
भूमीगत वीज वाहिन्याचा प्रश्न आर्थिक बाबीमुळे रेंगाळत पडला आहे. आमचे प्रयत्न सुरू आहे. परंतु रस्ते फोडावे लागणार आहे याचा त्रास पुन्हा नागरिकांना जाणवेल. सर्व रस्ते खोदावे लागणार आहे. 11 केव्ही व 9 केव्हीचे भूमीगत काम करावे लागेल. संपूर्ण म्हापसाला हे काम करावे लागणार आहे. 131 कोटी रुपये यासाठी खर्च करावा लागणार आहे. हे काम टप्प्याटप्प्याने न करता एकाचवेळी करण्यात येणार आहे. अशी माहिती म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली. मलनिःस्सारणचे काम सुरू आहे हे काम मंदगतीने सुरू आहे. काही गटारामध्ये पुन्हा माती पडते तेही काम आठवडय़ाभरात पूर्ण होईल, अशी माहिती आदारांनी दिली.
दुकाने खुली करावी की नाही याबाबत अंतिम निर्णय सर्वानुमते- नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर
राज्यात कर्फ्यू वाढलेला आहे. आमच्या मार्केटच्या विविध समित्या काढल्या नव्हत्या त्यामुळे आम्ही त्यावर निर्णय घेऊ शकलो नाही. संचारबंदी सध्या सर्व राज्यात व भारतात आहे. म्हापशातील संचारबंदीबाबत अंतिम निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही. राज्यात कोरोना केसेस दिवसेंदिवस वाढत आहे. काल 200 तक्रारी होत्या. लोकांची टंचाई झालेली आहे. आम्ही दुकाने खुली करण्यास गेल्यास लोक तुटून पडतात यावर अंतिम निर्णय घेण्याचा विचार चालला आहे. कोरोना त्वरित होऊ शकतो लोकांनी गर्दी करू नये, सवतःचा व दुसऱयांच्या जीवाची काळजी घ्यावी. टंचाई आहे खरी मात्र एसओपीची पालन करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले आहे.
म्हापसाः पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर
पालिका मार्केट समिती- अध्यक्ष विराज फडके, सदस्य आशीर्वाद खोर्जुवेकर, साईनाथ राऊळ, बाबरा कारास्को, कमल डिसौजा. सार्वजनिक कामे गटार- अध्यक्ष आशीर्वाद खोर्जुवेकर, सदस्य केल ब्रागांझा, विराज फडके, तारक आरोलकर, अन्वी कोरगांवकर. नगरनियोजन व विकास समिती- अध्यक्ष केल ब्रागांझा, सुशांत हमरलकर, साईनाथ राऊळ, प्रिया मिशाळ, सुधीर कांदोळकर. पर्यावरण, गार्डन, खुली जागा समिती- अध्यक्ष किशोरी कोरगांवकर, स्वप्नील शिरोडकर, प्रिया मिशाळ, विकास आरोलकर, नूतन बिचोलकर. विद्युत रोषणाई, लायब्ररी समिती- अध्यक्ष विकास आरोलकर, केल ब्रागंझा, किशोरी कोरगांवकर, बाबरा कारास्को, आनंद भाईडकर.