प्रतिनिधी / म्हापसा
मंगळवारी सुरू झालेल्या मासळी मार्केटमध्ये बुधवारी सकाळी बिगर गोमंतकीय मासळी विक्रेत्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने यावेळी सकाळी म्हापसा मासळी मार्केटमध्ये वातावरण बरेच तंग झाले अखेर म्हापसा पोलिसांना बोलावून यात सर्वांना बाहेर काढण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.
म्हापसा मासळी मार्केट दोन महिन्याच्या कालावधीनंतर सुरू झाले असले तरी तेथील मासळी विक्रेत्या पालिकेने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर समाधानी नसून या मार्केटात गोमंतकीयांना सोडून बिगर गोमंतकीयांना प्राधान्य दिले जाते. त्यापेक्षा सदर मार्केट बंद असलेलेच बरे अशी माहिती म्हापसा मासळी विक्रेत्या संघटनेच्या अध्यक्षा शशिकला गोवेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, मार्केट निरीक्षक यांच्यासमवेत संयुक्त बैठक होऊन मुख्याधिकारी क्लेन मदेरा यांनी मासळी मार्केटमध्ये 60 जणांचा समावेश करून घेणार असे सांगितले होते मात्र प्रत्येक्षात येथे 35 जणांचा समावेश झाला. जे 35 जण आहेत ते संघटनेचे सदस्य असून इतर 25 जण बिगर गोमंतकीय असल्याचा आरोप श्रीमती गोवेकर यांनी केला.