प्रतिनिधी/ म्हापसा
येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱया म्हापसा नगरपालिकेच्या निवडणुकीत म्हापसा विकास आघाडीने आपले 20 उमेदवार जाहीर केले आहे. माजी मुख्यमंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत आमदार जोशुआ डिसोझा, निवडणूक प्रमुख रुपेश कामत, श्रीकृष्ण पोकळे, राजेंद्र पानकर, प्रकाश पेडणेकर, सलीम इसानी यांनी ही नावे म्हापसा भाजपा कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घोषित केली.
यावेळी घोषित करण्यात आलेले उमेदवार पुढीलप्रमाणेः वॉर्ड 1 रामा कशालकर, वॉर्ड 2- चंद्रशेखर बेनकर, वॉर्ड 3- बारबरा मार्टीन कारास्को, वॉर्ड 4- सुशांत हरमलकर, वॉर्ड 5- नीशा नागेश मयेकर, वॉर्ड 6- वृषाली सुभाष मांद्रेकर, वॉर्ड 7- संतोष कोरगावकर, वॉर्ड 8- मर्लीन डिसोझा, वॉर्ड 9- केल मॅथ्यू ब्रागांझा, वॉर्ड 10- प्रिया वल्लभ मिशाळ, वॉर्ड 11- किशोरी किशोर कोरगांवकर, वॉर्ड 12- आशीर्वाद खोर्जुवेकर, वॉर्ड 13- श्रीया निशिकांत साळगांवकर, वॉर्ड 14- साईनाथ राऊळ, वॉर्ड 15- स्वप्निल शिरोडकर, वॉर्ड 16- विश्वास साळगावकर, वॉर्ड 17- सुचिता सुनील गोवेकर, वॉर्ड 18- मनीषा रोहन कवळेकर, 19- रेणुका भक्ता, वॉर्ड क्र. 20- दिपक म्हाडेश्री.
म्हापसा विकास आघाडीनी यंदा 13 नवीन चेहऱयांना तर 11 महिलांना संधी दिली आहे. त्यात 7 माजी नगरसेवक, 4 युवा उमेदवारांचा समावेश आहे अशी माहिती यावेळी रुपेश कामत यांनी दिली.