वार्ताहर / म्हैसाळ
म्हैसाळ -नरवाड मार्गावर 15 मार्च रोजी दुपारी ३ वाजता अंबिकानगर जवळील पुलावर खाजगी प्रवाशी बस व मालवाहतूक टेंपो एकमेकांना पास करताना अडकल्या त्यामुळे दोन्ही ही वाहने पुढे मागे घेता आले नाही. परीणामी तब्बल तीन तास या मार्गावर वरील वाहतूक खोळंबली आहे.
या मार्गावर हायवे साठी खडी मुरूम वाहतूक करणारे डंपर,एस टी बसेस अन्य वाहतूक जोरदारपणे सुरू आहे.त्यामुळे दोन्ही बाजूला वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कर्नाटक सिमेवर चिंचली यात्रेसाठी जाणेस बंदी घालण्यात आलेने नाका चुकवुन आड मार्गाने वाहतूक सुरू आहे.त्यामुळे या म्हैसाळ नरवाड मार्गावर वाहतूक ची वर्दळ वाढली आहे.