वार्ताहर / म्हैसाळ
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे अभ्यास केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव गवळी यांनी दिली. सदर मंजूरी चे पत्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात स्वीकारले चे गवळी यांनी सांगितले.
म्हैसाळ हे महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर असून मिरज तालुक्यातील पू्र्व भागासह शेजारच्या सीमा भागातील बेळगांव जिल्ह्यातील अपुरे शिक्षण राहिलेल्या व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मराठी भाषिक मुलामुलींची सोय झाली आहे.