म्हैसूर/प्रतिनिधी
खासगी रुग्णालयांनी शासनाने ठरविलेल्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे निर्देश म्हैसूरचे जिल्हा प्रभारी सचिव एन. जयराम यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. रूग्णांची माहिती व बेड उपलब्धता आणि इतर माहिती तपासण्याचे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही याची माहिती जाणून घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालये रिसेप्शन काउंटरवर कोरोना संबंधित तपशील दाखवत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तोंडी आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, खासगी रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हा प्रशासनाने गठीत केलेल्या पथकांना अशा घटनांची नोंद घ्यावी आणि उल्लंघन करणार्यांवर त्वरित कारवाई करावी असे जिल्हा प्रभारी सचिवांनी सांगितले आहे.