म्हैसूर/प्रतिनिधी
प्रशासनाच्या कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात आज झाली. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केल्यांनतर या लसीकरण मोहिमेलासुरुवात झाली. म्हैसूर येथे प्रथम लस पीकेटीबी सेनेटोरियम कॅम्पसमधील ट्रॉमा सेंटर येथे चतुर्थश्रेणी वर्गातील कर्मचारी संदेश याला देण्यात आली.
मोहिमेदरम्यान उपायुक्त रोहिणी सिंधुरी उपस्थित होत्या. आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्रसारित केले होते.
लसीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नऊ ठिकाणी व्यवस्था केली आहे.