म्हैसूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. यामध्ये म्हैसूर पॅलेसमधील एका कर्मचार्याच्या नातेवाईकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने म्हैसूर पॅलेस बंद करण्यात आला आहे.
म्हैसूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी सोमवारी हा राजवाडा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनने राजवाड्यात सामान्य नागरिकांना प्रवेश देण्यापूर्वी राजवाडा परिसर निर्जंतुकीकरण केला आहे.
दरम्यान, म्हैसूरमध्ये आतापर्यंत 528 प्रकरणे नोंदली गेली आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत 205 इतके रुग्ण उपचारामध्ये होते. तर आतापर्यंत २६८ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच म्हैसूरमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.