म्हैसूर/प्रतिनिधी
राज्यात होणारा रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबायचं नाव घेत नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. आता म्हैसूर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या (सीसीबी) अधिकाऱ्यांनी दोन प्रकरणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळ्याबाजार केल्याच्या आरोपाखाली दोन खासगी रुग्णालयातील ३ कर्मचार्यांसह ५ जणांना अटक केली.
शंकरमठ रोड, के.आर. मोहल्ला येथील एका खासगी शाळेजवळ महागड्या किंमतीत रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती सीसीबी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरेश (वय २७), राघवेंद्र (वय २६) आणि बाबू राघवेंद्र (१३) यांना अटक केली. सुरेश हा जेपी नगरमधील खासगी रुग्णालयात काम करतो. संक्रमित रुग्णांना इंजेक्शन देण्याऐवजी त्याने ती विकण्यासाठी ठेवली होती. आरोपीच्या ताब्यातून तीन इंजेक्शन्स आणि सात हजारांची रोकड जप्त केली आहे.
दुसर्या प्रकरणात एन.आर. या परिसरातील गांधी नगरातील राजेश (वय २२) आणि मल्लेश (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दहा रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली आहेत. हे दोघेही विद्यारण्यपुरा येथील खासगी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. दोघेही हॉस्पिटलमधून इजेक्शन चोरत असत आणि बाहेर जास्त किंमतीला विकत असत. या प्रकरणी एन.आर. मोहल्ला आणि दुसरे केस के.आर. मोहल्ला पोलीस ठाण्यात गन्हे दाखल झाले आहेत.