म्हैसूर/प्रतिनिधी
म्हैसूरमध्ये दिवसांपूर्वी चार अज्ञात तरुणांनी एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी त्या ठिकाणी भेट दिली जिथे काही दिवसांपूर्वी म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती.
मंगळवारी रात्री म्हैसूरमध्ये चार जणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना ललीथद्रिपुरा येथे रात्री आठच्या सुमारास घडली जेव्हा त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चार जणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या मित्रालाही मारहाण केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.