चव्हाट गल्ली मंडळाने केले होते आयोजन
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
चव्हाट गल्ली येथे मोटारसायकलबरोबर म्हैस पळविण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीला मोठा प्रतिसाद मिळाला. या शर्यतीत कोल्हापूर, सांगली, मिरज, बेळगाव जिल्हय़ातील गवळी समाजाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटनास आमदार अनिल बेनके, भाऊ नाकाडी, जोतिबा नाईक, संदीप मोहिते, सोनू किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जुनी परंपरा जोपासल्याबद्दल आमदारांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विक्रांत मोहिते, महेश मोहिते, भास्कर चव्हाण, उत्तम नाकाडी, प्रशांत मोहिते, प्रवीण राणे, प्रवीण धामणेकर, अमित कावळे, विनायक खांडेकर, भाऊराव मोहिते, अनंत निळकंठाचे, श्रीकांत जाधव, गवळी समाज पंच मंडळी व चव्हाट गल्लीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले.