प्रतिनिधी /बेळगाव
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याविषयी कन्नड आणि इंग्रजी पाठय़पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण असलेला पाठ घालण्यात आला आहे. त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मंगळवार दि. 28 रोजी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. सकाळी 11 वा. क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले आहे.