ऍड. महेश बिर्जे यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
1 नोव्हेंबर काळय़ादिनी काढण्यात आलेल्या मूक सायकल फेरी दरम्यान पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यानंतर 43 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविला होता. या खटल्याची सुनावणी मंगळवार दि. 16 रोजी होणार आहे. मात्र न्यायालयामध्ये प्रवेश नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन ऍड. महेश बिर्जे यांनी केले आहे.
गोवावेस सर्कलजवळ मूक सायकल फेरी दरम्यान पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यानंतर म. ए. समितीच्या दत्ता येळ्ळूरकरसह 43 जणांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मात्र न्यायालयामध्ये वकिलांव्यतिरिक्त इतर कोणालाच प्रवेश नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.