सुनावणी आता 10 जुलै रोजी
बेळगाव \ /प्रतिनिधी
प्रादेशिक कार्यालयासमोर तिरंगा ध्वजापेक्षाही लाल पिवळय़ा रंगाचा झेंडा उंच आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे. तेव्हा लाल पिवळा ध्वज हटवावा, या मागणीसाठी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौक येथे तोंडावर काळय़ा पट्टी बांधून निदर्शने केली. या प्रकरणी 7 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनवाणी बुधवारी होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली असून 10 जुलै रोजी त्या खटल्याची सुनावणी होणार आहे.
म. ए समितीच्या द्वारकानाथ उरणकर, अजित कोकणे, नारायण किटवाडकर, सतीश गावडोजी, सुधीर कालकुंद्रीकर, मनोज पावशे, सूरज कणबरकर यांच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा नेंदविण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे काम पाहता आहेत.