पंच कमिटीने दिला एक वॉर्ड एक उमेदवार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महानगरपालिका निवडण़ुकीत म. ए. समितीच्या आवाहनाला साथ देऊन पंच कमिटीने एक वॉर्ड एक उमेदवार दिल्याबद्दल वॉर्ड क्र. 31 व 32 च्या भागातील पंचकमिटी व उमेदवारांचे शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी अभिनंदन केले.
वॉर्ड क्र. 31 च्या उमेदवार श्रीमती राजश्री नंदकुमार हावळ व वॉर्ड क्र. 32 चे आशुतोष कांबळे यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी आनंदराव जाधव, मनोज पावशे, शिवाजीराव अतिवाडकर, बाळू पाटील, बाळू दफेदार, गजानन बाडीवाले, किरण बडवाण्णाचे, अतुल केसरकर व कार्यकर्ते उपस्थित होते. येथील पंच कमिटी व अन्य उमेदवारांचे अनुकरण इतर वॉर्डमध्ये करावे, असे आवाहन समितीच्यावतीने किरण गावडे यांनी केले.