प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरला येथील सहय़ाद्री मल्टीस्टेट, मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीकडून पंचवीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. सोसायटीच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी चेअरमन पी. पी. बेळगावकर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सीमाभागातील युवा कार्यकर्ते एकत्र येऊन या महामारीच्या संकटप्रसंगी गरीब व सामान्य जनतेला मदतीचा हात देण्याचे स्तुत्य काम करीत असल्याबद्दल चेअरमन बेळगावकर यांनी समिती कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी संचालक किरण शं. पाटील, विजय भोसले, प्राचार्य आनंद व्ही. पाटील, शीतल कोकितकर, कार्यवाह अनिल कणबरकर, मारुती निलजकर, युवा समितीचे पदाधिकारी व सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.