कोरोना योद्धय़ांच्या सोयीसाठी भोजन व्यवस्था सुरूच
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा मंदिर येथे आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. हे सेंटर सुरू झाल्यापासून तेथील रुग्ण आणि कर्मचाऱयांसाठी म. ए. समिती महिला आघाडीतर्फे दररोज दुपारी आणि रात्री चपाती-भाजी विनामूल्य देण्यात येत आहे.
कोरोनाकाळात महिला आघाडीतर्फे जनतेच्या प्रामुख्याने कोरोना योद्धय़ांच्या सोयीसाठी भोजन व्यवस्था सुरूच राहिली. पहिल्या लाटेदरम्यानही हे काम सुरू होते. आता मराठा मंदिर येथील आयसोलेशन सेंटरसाठी आघाडीतर्फे ही सेवा देण्यात येत आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, त्यांच्या सहकारी राजश्री बाबुळकर, शालिनी पाटील, आशा पाटील, शेवंता भोसले व भरत किल्लेकर हे काम करत आहेत.