प्रतिनिधी / बेळगाव :
कोविड 19 च्या संकटात नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी या उद्द्sशाने म .ए. समितीच्या महिला आघाडीतर्फे होमिओपॅथिक गोळय़ांचे वितरण करण्यात आला. भरतेश होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोकणे, डॉ. सागर पाटील यांच्या हस्ते सदर गोळय़ा अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्याकडे देण्यात आल्या.
महिला आघाडीच्या सदस्या प्रिया कुडची, अनुपमा कोकणे, कांचन भातकांडे, भाग्यश्री जाधव, कांचन येळ्ळूरकर, सुजाता बामुचे यांच्या उपस्थितीत या परिसरातील 200 हून अधिक जणांना सदर गोळय़ांचे वितरण करण्यात आले.