कोविड-19 रुग्णांवर उपचार करणाऱया आरोग्य कर्मचाऱयांच्या बचावासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अत्यंत आवश्यक आहे, परंतु देशात याची कमतरता भासत आहे. पीपीई देशातच निर्माण केले जाऊ शकते. पीपीईसाठी आवश्यक सर्व कच्चा माल देशातच उपलब्ध आहे. परंतु एका यंत्राच्या कमतरतेमुळे याचे पुरेसे उत्पादन करणे शक्य होत नसल्याची स्थिती आहे. हे यंत्र चीनमधून मागविले जाणार आहे. परंतु चीनने याकता 14 आठवडे म्हणजेच 3 महिन्यांची मुदत मागितली आहे.
देशात फॅब्रिक निर्माण करण्याची पुरेशी सुविधा तसेच आवश्यक कच्चा माल देखील आहे. परंतु पीपीईचे शिवणकाम करणाऱया यंत्राचा अभाव आहे. सरकारने चीनकडून आणखी यंत्रे मागविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चीनच्या सरकारने 12 आठवडय़ांची मुदत मागितली होती असे एका अधिकाऱयाने सांगितले आहे. जर्मनीतून ही यंत्रे मागविली जाऊ शकतात, परंतु कोरोना संकटामुळे पूर्ण देश ठप्प पडला आहे.
भारत स्वबळावर दरदिनी पीपीईचे उत्पादन 23 एप्रिलपर्यंत दुप्पट करू शकतो. सद्यकाळात प्रतिदिनी 12 हजार पीपीई निर्माण होतात. 23 एप्रिलपर्यंत उत्पादन क्षमता वाढल्यास प्रतिदिन 30 हजार पीपीईपर्यंत हे प्रमाण वाढू शकते. देशाला आणखी 200 ते 300 हॉट एअर सीम सीलिंग यंत्रे हवीत असे अधिकारी म्हणाला.
पीपीईच्या कमतरतेमुळे आरोग्य कर्मचारी आजारी पडण्याच्या भीतीमुळे अन्य देशातून पीपीई मागविण्यात येत आहे. आतापर्यंत 2 लाख पीपीई प्राप्त झाले असून 15 एप्रिलपर्यंत आणखीन 2 लाख पीपीई येणार आहेत. चिनी पुरवठादारांवर ही यंत्रे लवकर पाठविण्यासाठी दबाव आणण्याची सूचना सरकारने खासगी कंपन्यांना केली आहे. यंत्रे आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान बीजिंग, गुआंझो आणि हाँगकाँगमध्ये पाठविले जाऊ शकते.
एक आठवडय़ापूर्वी भारतात एकही पीपीई निर्माण करण्यात आले होते, परंतु आता 65 हजार पीपीईची निर्मिती करण्यात आली आहे. जूनपर्यंत 1.5 कोटी पीपीई निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. देशात पीपीई निर्माण करणाऱया 12 कंपन्या असून पुढील काही आठवडय़ांमध्ये आणखीन 12 कंपन्यांची भर पडणार असल्याची माहिती अधिकाऱयाने दिली आहे.