शिरोळ / प्रतिनिधी :
माजी आमदार कै. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या नावाने दिला जाणारा चालू वर्षीचा समाजभुषण पुरस्कार शाश्वत शेती तज्ञ अशोक बंग यांना देण्यात येणार असल्याची माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
1 एप्रिल रोजी आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वर्धा जिल्ह्यातील शास्वत शेती तज्ञ अशोक बंग यांना चालू वर्षीचा आप्पासाहेब सा. रे. पाटील समाज भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख एक लाख 111रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या पत्रकार परिषदेस विनोद शिरसाठ, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, नगराध्यक्ष श्रीराम पाटील, सर्जेराव शिंदे, सर्जेराव पवार, संजय पाटील, महेंद्र बागी, दामोदर गावडे, प्रमोद माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.