बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर कमालीच्या मर्यादा लादण्यात आल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी 13 अटी घालून उत्सवाला परवानगी दिली असून घरगुती गणेशोत्सवाबाबतीत सौम्यपणा दर्शविण्यात आला आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाऐवजी जवळच्या मंदिरात श्रींची प्रति÷ापना करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱयांनी यासंबंधी एक आदेश जारी केला आहे. पोलीस आयुक्त, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा नगरविकास विभाग, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदारांवर या आदेशांचे अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध आपत्ती निवारण कायदा-2005 व भादंवि 188 अन्वये कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.