शैक्षणिक सहलींना बेक : पर्यटनस्थळांवर मर्यादा, परिवहनचा सिझन वाया
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा हळूहळू वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यंदाही परिवहनला व्यावसायिक हंगामापासून दूर रहावे लागणार आहे. डिसेंबर-जानेवारी दरम्यान शैक्षणिक सहली, यात्रा-जत्रा या माध्यमातून परिवहनला अधिक उत्पन्न मिळत असते. मात्र यंदाही पर्यटनस्थळाबरोबर मंदिरात दर्शनासाठी मर्यादा आल्याने परिवहनचा व्यावसायिक महसूल बुडाला आहे.
परिवहनला दैनंदिन वाहतुकीबरोबर उत्सव, शालेय सहली आणि यात्रा-जत्रांच्या माध्यमातून अधिक महसूल मिळतो. मात्र सद्यस्थितीत शाळा सुरू असल्या तरी शैक्षणिक सहलींना अद्याप परवानगी मिळाली नाही. तसेच मंदिरेदेखील बंद आहेत. त्यामुळे यंदाही परिवहनला फटका बसला आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शैक्षणिक सहली आणि यात्रा-जत्रांच्या निमित्ताने विविध मार्गांवर बसफेऱया अधिक धावतात. याच दरम्यान शैक्षणिक सहलींच्या हंगामाला सुरुवात होते. शिवाय पर्यटक म्हणून बाहेर फिरणाऱया प्रवाशांची संख्यादेखील अधिक
असते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने पर्यटनस्थळे आणि जत्रा-यात्रा थांबल्याने परिवहनच्या व्यावसायिक हंगामावर पाणी फिरले आहे. दरवषी डिसेंबरदरम्यान पंधराहून अधिक बसेस शैक्षणिक सहलीसाठी विविध मार्गांवर धावत होत्या. मात्र यंदा सहलीच थांबल्याने बसदेखील थांबल्या आहेत.
पर्यटकांची संख्या घटली…
डिसेंबर ते जानेवारीदरम्यान विविध पर्यटनस्थळांना भेटी देणाऱया पर्यटकांची संख्या अधिक असते. बेंगळूर, म्हैसूर, विजापूर, श्रवणबेळगोळ यासह महाराष्ट्रात आणि गोव्याला जाणाऱया पर्यटकांची संख्याही अधिक असते. मात्र यंदाही या पर्यटनस्थळांवर मर्यादा आल्याने पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी धावणाऱया बसच्या माध्यमातून मिळणारा महसूलदेखील थांबला आहे.