ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या हज यात्रेवर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सौदी अरबियाने भारतासह इतर देशांच्या यात्रेला परवानगी नाकारली आहे. सौदी अरेबियातील केवळ 60 हजार मुस्लिम लोकांना या यात्रेसाठी परवानगी देण्यात आली आहे.
सौदी प्रेस एजन्सीनुसार, यावर्षी हज यात्रेसाठी देशातील 60 हजार मुस्लिम नागरिकांनाच परवानगी देण्यात आली आहे. यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्यांचे वय 18 ते 65 असावे. या लोकांनी लस घेतलेली असावी. तसेच ते आजारी नसावेत.
हज यात्रेसाठी दरवर्षी जवळपास 20 लाख यात्री जात असतात. कोरोना संकटामुळे मागील वर्षी केवळ 1 हजार लोकांना हज यात्रेसाठी परवानगी देण्यात आली होती.