मत्स्य विभागाची माहिती : बेळगाव जिल्हय़ात अधिक मत्स्योत्पादनासाठी प्रयत्न : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत शेतकऱयांना प्रोत्साहन
सुनील राजगोळकर /बेळगाव
मत्स्य उत्पादनाबरोबरच त्यांची पैदास वाढविण्यासाठी मत्स्य विभागातर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या पावसाळी हंगामात मत्स्य विभागाकडून जिल्हय़ातील विविध जलाशय व तलावांमध्ये तब्बल 92 लाख मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्यपालन विभागाने दिली आहे. गतवषी खात्याने पावसाळी हंगामात जलाशय व तलावांमध्ये 90 लाख मत्स्यबीज सोडले होते. त्या तुलनेत यंदा मत्स्यबीज सोडण्याच्या प्रमाणात 2 लाखांनी वाढ झाली आहे. परिणामी मत्स्योत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा खात्याने व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जलाशये व तलाव यंदा जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे मत्स्यबीज सोडण्याच्या कामाला गती आली आहे.
गतवषी जलाशय व विविध तलावांमध्ये सोडण्यात आलेल्या मत्स्यबीजातून तब्बल 5416.39 मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले होते. यंदा त्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. शिमोगा, मद्रास, आंध्रप्रदेश यासह इतर ठिकाणाहून मत्स्यबीज आणण्यात आले आहे. शिवाय माशांचा प्रजननाचा काळ हा जून ते ऑगस्टपर्यंत असल्याने मत्स्यबीज सोडण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. जिल्हय़ातील पाणीसाठा असलेल्या तलावात रोहू, गिरमळ, मृगळ, कटला आदी जातीचे मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मासे खवय्यांना विविध जातीचे मासे उपलब्ध होणार आहेत.
हिडकल जलाशयात 8 लाख मत्स्यबीज सोडणार
मत्स्य विभागातर्फे पावसाळय़ाच्या हंगामात दरवषी विविध जलाशये व लहान-मोठय़ा तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात येते. यंदा तब्बल 92 लाख मत्स्यबीजांपैकी एका हिडकल जलाशयात 8 लाख मत्स्यबीज सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे. अलीकडे शेतकऱयांचादेखील मत्स्य पालनाकडे ओढा वाढला असून जिल्हय़ात 300 हून अधिक शेतकरी मत्स्यपालन करतात. नैसर्गिक तलाव, पाझर तलाव व इतर तलावांमध्ये मत्स्य क्यवसाय करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. या शेतकऱयांना दरवषी मत्स्य विभागातर्फे सवलतीच्या दरात मत्स्यबीज उपलब्ध करून दिले जाते. यंदाही शेतकऱयांना मत्स्यबीज उपलब्ध करून दिले जाणार असून संबंधित शेतकऱयांनी रामतीर्थनगर येथील मत्स्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मत्स्य विभागाकडून मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी दरवषी जिल्हय़ातील मोठे तलाव भाडेतत्त्वावर घेऊन मत्स्यबीज सोडले जाते. यंदाही तलाव भाडेतत्त्वावर घेऊन मत्स्य उत्पादनावर भर दिला जाणार आहे. मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना प्रशिक्षण देऊन पासदेखील उपलब्ध करून दिला जातो.
शेतकऱयांना मत्स्यपालनासाठी प्रोत्साहन
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत शेतकऱयांना मत्स्य पालनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. 1 हेक्टरसाठी 7 लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. अलीकडे शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी मत्स्यपालनाकडे वळले आहेत. साधारण लहान तलावात 35 हजारहून अधिक मत्स्यबीज सोडले जाते. माशांची चांगली वाढ झाल्यानंतर ते विक्रीला काढले जातात. यातून मत्स्यपालन करणाऱया शेतकऱयांची आर्थिक बाजू मजबूत होताना दिसत आहे
यंदा मत्स्यबीज अधिक प्रमाणात सोडण्यात येणार -एम. व्ही. कुलकर्णी (साहाय्यक संचालक, मत्स्यपालन खाते)
जिल्हय़ात गतवषीच्या तुलनेत यंदा मत्स्यबीज अधिक प्रमाणात सोडण्यात येणार आहे. गतवषी 5416.39 मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले होते. यंदा त्यात वाढ होणार आहे. जिल्हय़ातील पाणीसाठा असलेल्या जलाशय व तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. शिवाय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत शेतकऱयांना विविध सुविधा पुरवून मत्स्य पालनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱयांनी पुढे यावे
नेसरी, बैलहोंगल गुड्डगनहट्टी या ठिकाणी 8 शेत तलाव आहेत. मागीलवषी या तलावांतून 95 हजार माशांचे उत्पन्न मिळाले होते. रोहू, गिरमळ, मृगळ, कटला आदी माशांचे उत्पन्न घेतो. यंदा देखील 25 हजार मत्स्यबीज तलावांमध्ये सोडणार आहे. शिवाय इतर जातीच्या माशांचेदेखील उत्पादन घेतो. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱयांनी पुढे यावे. गेल्यावषी मत्स्य उत्पादन चांगले मिळाले असून यंदाही मत्स्योत्पादनात वाढ होणार आहे. मान्सून पावसाने तलाव पूर्ण भरले असून मत्स्यबीज सोडणे सोयीस्कर होणार आहे.
-विजय मारुती बंडेर (मत्स्यपालक गुड्डगनहट्टी दड्डी)
यंदा जिल्हय़ातील जलाशय-तलावांमध्ये सोडण्यात येणारे मत्स्यबीज
तालुका | सोडण्यात येणारे मत्स्यबीज लाखात |
अथणी | 3.5 |
कागवाड | 0.50 हजार |
बैलहोंगल | 8 लाख |
कित्तुर | 10 लाख |
बेळगाव | 10 लाख |
चिकोडी | 3.5 लाख |
निपाणी | 0.50 हजार |
गोकाक | 3 लाख |
मुडलगी | 0 |
हुक्केरी | 5 लाख |
खानापूर | 10 लाख |
रायबाग | 4 लाख |
रामदुर्ग | 8 लाख |
सौंदत्ती | 6 लाख |
एकूण | 72 लाख |
गतवषी जिल्हय़ात झालेले माशांचे उत्पादन
तालुका | माशांचे उत्पादन (मेट्रीक टन) |
अथणी | 455.05 |
कागवाड | 200.06 |
बैलहोंगल | 505 |
कित्तुर | 595 |
बेळगाव | 523 |
चिकोडी | 575.09 |
निपाणी | 198 |
गोकाक | 375 |
मुडलगी | 185 |
हुक्केरी | 620 |
खानापूर | 700 |
रायबाग | 457 |
रामदुर्ग | 607 |
सौंदती | 698 |
एकूण | 6693.21 |