प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन मंडळाच्या व्यवसायिक हंगामाला साधारण ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होते. या काळात परिवहनच्या अनेक विशेष व जादा बस विविध मार्गावर धावत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे परिवहनचा ऑक्टोबर सिझन वाया गेला आहे. त्य़ामुळे परिवहनच्या तोटय़ात आणखी भर पडली आहे.
जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळय़ाचा काळ संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात प्रवासी संख्येबरोबर बाहेर फिरणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात परिवहनच्या उत्पन्नातही वाढ होत असते. मात्र यंदा कोरोनामुळे परिवहनच्या ऑक्टोबरच्या सिझनवर पाणी फिरले आहे. कोरोनामुळे परिवहनला तब्बल 110 कोंटी रूपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यंदा कोरोनामुळे अनेक पर्यटन स्थळे, मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. याचा फटकाही परिवहनला बसला आहे. दरम्यान नवरात्रोत्सव काळात मंदिरांना भेटी देणाऱया भक्तांची संख्या अधिक असते त्य़ामुळे परिवहनकडून भक्तांसाठी विशेष बसेसची क्यवस्था केली जाते. मात्र कोरोनामुळे मंदिरांचे दरवाचे बंद असल्याने भक्त प्रवाशांची संख्या रोडावली आहे. याचा फटका परिवहनला बसला आहे.
बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र, गोवा राज्यांच्या सीमेवर असल्याने बेळगाव आगारात स्थानिक प्रवाशांबरोबर महाराष्ट्र व गोवा राज्यांतील प्रवाशांची संख्या अधिक असते. बेळगाव आगाराला महाराष्ट्र व गोवा राज्यात धावणाऱया बसच्या माध्यमातून 40 टक्के उत्पन्न मिळते. त्यामुळे राज्यातील इतर आगारापेक्षा बेळगाव जिल्हय़ातील आगारांचे उत्पन्न जास्त आहे. दसरा साजरा करण्यासाठी अनेक जण सहकुटुंब गावी जातात दरम्यान दसरा सणासाठी विशेष बससेवा पुरविली जाते. त्य़ामुळे दरवषी परिवहनला या माध्यमातून चांगला महसूल मिळत होता. मात्र यंदा कोरोनामुळे प्रवाशांची संख्या रोडावल्याने सणा सोडण्यात येणाऱया विशेष बस देखील ठप्प झाल्या आहेत. विशेष करून प्रवासासाठी स्वतःच्या वाहनांचा वापर केला जात असल्याने बसला प्रवाशांची थंडावलेलीच पहायला मिळत आहे.
पर्यटन स्थळे बंदचा फटका
विशेषतः करून ऑक्टोबर महिन्यात पर्यटन स्थळांना भेटी देणाऱया पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे राज्यातील बेंगळूर, म्हैसूर, विजापूर, श्रवणबेळगोळ, यासह महाराष्ट्रातील महाबळेश्वर, तर गोव्याला जाणाऱया प्रवाशांची अधिक असते मात्र यंदा कोरोनामुळे अनेक ठिकाणची पर्यटन स्थळे बंद असल्याने पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे परिवहनला दरवषी ऑक्टोबर महिन्यात मिळणाऱया उत्पादनापासून यंदा वंचित रहावे लागले आहे.