पंचांगकर्त्यांचा अंदाज : पूर्वमोसमी पावसाचे योग : तीव्र उन्हाळय़ासह वळिवाचे पाऊस अनुभवता येणार
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. नवीन वर्ष कसे जाईल? याची उत्सुकता प्रत्येकाला असली तरी बळीराजाला मात्र पर्जन्यमान कसे असेल? याचाच विचार असतो. त्यादृष्टीने विविध पंचांगकर्त्यांनी यंदाच्या पर्जन्याचा अंदाज वर्तविला आहे. यावषी उष्णतामान वाढत असले तरी पूर्वमोसमी पावसाचे योग आहेत. मात्र तीव्र उन्हाळा आणि वळवाचे पाऊस दोन्ही अनुभवता येणार आहेत, असा होरा पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
विशेषतः जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस समाधानकारक होईल. परंतु काही ठिकाणी हानीकारक असेल. पावसाळय़ाच्या उत्तरार्धात मात्र पर्जन्यमान कमी राहील. मात्र एकंदरीत सरासरीइतका पाऊस होईल, असा त्यांचा अंदाज आहे. रुईकर पंचांग व महालक्ष्मी पंचांगामध्ये पर्जन्यमान भाकितामध्ये बऱयापैकी साम्य आढळते.
25 मे रोजी दुपारी रोहिणी नक्षत्र लागते. त्याचे वाहन मोर असून गडगडाटासह पाऊस पडेल. मृग नक्षत्राला वादळी वारे सुटून महिनाअखेरीस पाऊस सुरू होईल. आर्द्रा नक्षत्राला वाहन मेंढा असून हवेत गारवा जाणवेल. परंतु मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सावंतवाडी येथे पाऊस होईल. पुनर्वसु नक्षत्राला पडणारा तरणा पाऊस धोका देणारा असू शकतो. जेथे पडेल तेथे अतिवृष्टीने नुकसान होईल.
पुष्य नक्षत्राला वाहन कोल्हा असून पाऊस अनिश्चित स्वरुपाचा राहील. सातारा, बेळगाव, पंढरपूर यासह महाराष्ट्रातील काही शहरात पाऊस संभवतो. आश्लेषा नक्षत्राचे वाहन मोर असून याला असळकाचा पाऊस म्हणतात. हवेत बदल होऊन पिके सुधारतील. मघा नक्षत्राला वाहन घोडा असून समुद्रकाठी वादळी वारे व पाऊस यामुळे नुकसान संभवते. याला सासूचा पाऊस म्हणतात. तर पूर्वा नक्षत्रावर पडणाऱया पावसाला सुनेचा पाऊस असे म्हटले जाते. तो समाधानकारक असेल. उत्तरा नक्षत्राचे वाहन गाढव आहे. त्याला रब्बीचा पाऊस म्हणतात. पाऊस खंडवृष्टीने पडेल. हस्त नक्षत्राचे वाहन कोल्हा असून बेळगाव, पुणे, पूर्व भाग, सोलापूर, कोल्हापूर येथे पाऊस होईल. कापूस व तंबाखू या पिकांना कदाचित हानी होईल.
चित्रा नक्षत्राचा पाऊस आंधळीचा पाऊस असून तो अल्पप्रमाणात पडेल तर स्वाती नक्षत्राचा पाऊस तुरळक प्रमाणात होईल. विशाखा नक्षत्राला तुरळक पाऊस होण्याची शक्मयता आहे. 18 नोव्हेंबरनंतर थंडीचा प्रादुर्भाव जाणवेल.
सर्वच पंचांगामध्ये वास्तु, शुभाशुभ ग्रह, मुहूर्त, वास्तु मुहूर्त, सूर्यग्रहण, सण-वार, व्रत-वैकल्ये, फणी चक्र, शेतीच्या कामाचे मुहूर्त, कुलधर्म, कुलाचार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची चर्चा खूप असली तरी पंचांगांची खरेदीही तितकीच तेजीत होत आहे.
पंचांगकर्त्यांच्या नोंदीनुसार…
मृग नक्षत्र : दि. 8 जून 2022 रोजी बुधवारी दुपारी 12.37 वाजल्यापासून सूर्याचे मृग नक्षत्र सुरू होत आहे. प्रवेशवेळी सिंह लग्न उदित होत असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून फक्त शनि अमृत नाडीत आहे. ग्रहांचे योग पाहता विजांसह वादळी पावसाची शक्मयता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई येथे पर्जन्यमान चांगले असेल. दि. 8, 9, 16 ते 20 पर्यंत पाऊस अपेक्षित आहे.
आर्द्रा नक्षत्र : दि. 22 जून 2022 रोजी बुधवारी सकाळी 11.42 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. सिंह लग्न उदित असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून फक्त शनि ग्रह अमृत नाडीत आहे. या काळातील पाऊस समाधानकारक होईल. मात्र किनारपट्टीवरील पावसामुळे पूरसदृश परिस्थिती संभवेल. दि. 22, 23, 28 ते 3 जुलैपर्यंत हा पाऊस अपेक्षित आहे.
पुनर्वसु नक्षत्र : दि. 6 जुलै 2022 रोजी सकाळी 11.11 वाजता सूर्याचे पुनर्वसु नक्षत्रात आगमन होईल. प्रवेशावेळी सिंह लग्न असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून फक्त शनि अमृत नाडीत आहे. या नक्षत्रामध्ये मोठी पर्जन्यवृष्टी होणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा विभागात मोठा पाऊस पडेल. काही ठिकाणी पूर येईल. दि. 6, 7, 8, 13 ते 17 पर्यंत असेल.
पुष्य नक्षत्र : दि. 20 जुलै 2022 रोजी बुधवारी सकाळी 10.48 वाजता सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो. त्यावेळी कन्या लग्न असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून रवी, शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. 16 जुलैच्या ऋतुउत्तेजक रवी, बुध युतीमुळे पर्जन्यमान चांगले राहील. कोकण, कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्रात पाऊस चांगला होईल. दि. 26 ते 31 पर्यंत हा पाऊस असेल.
आश्लेषा नक्षत्र : दि. 3 ऑगस्ट 2022 रोजी बुधवारी सकाळी 9 वाजून 37 मिनिटांनी सूर्याचे आश्लेषा नक्षत्र सुरू होत आहे. प्रवेशावेळी कन्या लग्न असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्रांचे पर्जन्य सूचक वाहन मोर आहे. रवि-शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊससुद्धा चांगला होईल, असे ग्रहमान आहे. मात्र पावसामुळे काही ठिकाणी नुकसान होईल. दि. 3, 4, 10 ते 14 पाऊस अपेक्षित आहे.
मघा नक्षत्र : दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी बुधवारी सकाळी 7.22 वाजता सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. यावेळी सिंह लग्न असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून रवि-शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. 14 ऑगस्टच्या रवि-शनि प्रतियुतीमुळे या नक्षत्रात अल्पवृष्टीचे योग आहेत. काही भागात पाऊस बऱयापैकी होईल. दि. 23 ते 28 पाऊस पडणार आहे.
पूर्वा नक्षत्र : दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी मंगळवारी उत्तररात्री 3.17 वाजता सूर्याचे पूर्वा नक्षत्रात आगमन होईल. कर्क लग्न उदित असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून रवि-शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊस ओढ धरेल व पाऊस कमी पडेल. दि. 6 ते 10 पाऊस पडण्याची शक्मयता आहे.
उत्तरा नक्षत्र : दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी रात्री 9.14 वाजता सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यावेळी मेष लग्न असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून रवि-शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. या नक्षत्रातसुद्धा पाऊस ओढ धरेल व अल्पवृष्टी होईल. शेवटच्या चरणात पर्जन्यमान सुधारण्याची शक्मयता आहे. दि. 20 ते 24 पर्यंत पाऊस असेल.
हस्त नक्षत्र : दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी दुपारी 12.43 मिनिटांनी सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश होत आहे. त्यावेळी धनु लग्न असून या नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे. वरुणमंडल योग असून बुध, शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. या नक्षत्रात पाऊस हुलकावणी देईल. काही भागात जोरदार पाऊस पडेल. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा भागात वृष्टी होईल. दि. 4 ते 8 पाऊस अपेक्षित आहे.
चित्रा नक्षत्र : दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी उत्तररात्री 1.45 मिनिटांनी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. प्रवेशावेळी कर्क लग्न असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून बुध, शनि जलनाडीत आहेत. काही भागात वादळी पावसाचे योग आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान होईल. उत्तर व मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल. दि. 14 ते 18 पाऊस पडेल.
स्वाती नक्षत्र : दि. 24 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी दुपारी 12.18 वाजता सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करील. प्रवेशावेळी धनु लग्न उदित असून वरुणमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून फक्त शनि जलनाडीत आहे. या नक्षत्राचा पाऊस लहरी असेल. काही ठिकाणी पडेल. परंतु एकंदरीत अल्पवृष्टीचे योग आहेत. दि. 25, 26, 30 व 31 या काळात पाऊस अपेक्षित आहे.