प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱया वडगावच्या मंगाई देवीची यात्रा सलग दुसऱया वषी कोरोनामुळे भक्तांविनाच पार पडणार आहे. यात्रेच्या परंपरेत खंड पडू नये, यासाठी धार्मिक विधी मंगळवार दि. 3 रोजी केला जाणार आहे. धार्मिक विधी जरी होणार असला तरी कोणत्याच भाविकाला मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. यामुळे दरवषी होणारी लाखो रुपयांची उलाढाल यावषी मात्र ठप्प झाली आहे.
बेळगाव शहर परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून वडगावच्या मंगाई देवीच्या यात्रेची ख्याती आहे. दरवषी हजारो भाविक या यात्रेच्यानिमित्ताने वडगाव येथे येतात. देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. पूर्वी ही यात्रा केवळ एक दिवस असायची. परंतु आता मात्र तिचे स्वरुप बदलले असून तीन ते चार दिवस यात्रा होते. खेळणी, कपडे, खाद्य पदार्थ, गृहोपयोगी वस्तू, पाळणे यासह इतर स्टॉल्स मांडण्यात येतात. यामुळे एका मोठय़ा जत्रेचे स्वरुप या यात्रेला प्राप्त होते.
यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेवून मंदिराचे मानकरी व पोलीस प्रशासनाने या वर्षी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वडगावमधील नागरिकांना देवीचे दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर परिसरात बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले. तसेच पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. मागील वषीप्रमाणे यावषीही भाविकांनी घरामध्ये राहूनच यात्रा करायची आहे. मंगळवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत अवघ्या 30 मानकऱयांच्या उपस्थितीत गाऱहाणे उतरविले जाणार आहे. भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन मंदिराचे मानकरी चक्हाण-पाटील कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे.
लाखो रुपयांची उलाढाल ठप्प
मंगाई यात्रेमुळे दरवषी लाखो रुपयांची उलाढाल होते. बकरी बाजार तसेच स्टॉलमधून मोठय़ा प्रमाणात उलाढाल होते. त्यामुळे यात्रा होण्यापूर्वी आठ दिवसांपासून लहान विपेत्यांची जय्यत तयारी सुरु होते. अगदी फुले विपेत्यांपासून मोठय़ा विपेत्यांपर्यंत प्रत्येकालाच यात्रा रद्द झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होवून पुढील वषी तरी यात्रा सुरळीतपणे पार पडावी, अशी मागणी भाविक देवीकडे करीत आहेत.