चालू वर्षात समूह रोगप्रतिकारकक्षमता प्राप्त होण्याची शक्यता दिसून येत नाही. नजीकच्या भविष्यात अनेक देशांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शारीरिक अंतरासह अन्य कठोर उपाययोजनांवरच अवलंबून रहावे लागणार असल्याचे स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. लसींनी संवेदनशील लोकांचे रक्षण करणे सुरू केले असले तरीही 2021 मध्ये आम्ही समूह रोगप्रतिकारकक्षमता विकसित करू शकणार नाही. समूह रोगप्रतिकारकक्षमता काही ठिकाणी किंवा काही देशांमध्ये घडू शकते, परंतु तरीही जगभरातील लोकांचे रक्षण करणारे नसेल. सर्वसाधारणपणे समूह रोगप्रतिकारकशक्तीसाठी सुमारे 70 टक्के लसीकरण आवश्यक असते. यातून कुठल्याही आजाराच्या विरोधात पूर्ण लोकसंख्या सुरक्षित होते. परंतु कोरोना अत्यंत फैलाव करणारा असल्याने 70 टक्क्यांहून अधिक लोकांचे लसीकरण करावे लागणार आहे.
Previous Article…तोपर्यंत कोरोना विषाणू फैलावत राहणार!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.