अल्पवयीन मुलीला मातृत्व व बालविवाह प्रकरण
प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील अल्पवयीन तरूणीबरोबर चिपळूण तालुक्यातील एका गावातील मुलाबरोबर विवाह झाला. परंतु विवाहाच्या 15 दिवसातच ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणी पहिल्या तिघांना अटक केली. त्यानंतर आता बालविवाह लावला म्हणून यजमानांसह भटजीलाही अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या तिघांना 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही विवाह करणाऱया तिच्या नवऱयाला तसेच विवाहानंतर 15 दिवसातच ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने पोस्कोंतर्गत दोन प्रियकर व तिचा नवरा अशा तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन मुलीचा विधीपूर्वक विवाह करण्यात आला होता. विवाह लावून देणारे चिपळूण पेढे येथील भटजी अशा तिघांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. या तिघांनाही चिपळूण सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे व गुहागरचे सचिन पाटील करत आहेत.
48 जणांच्या यादीचे काय?
विवाहापूर्वीच मातृत्व प्रदान झालेल्या या अल्पवयीन मुलीचा तिच्या अज्ञानाचा फायदा गुहागर तालुक्यातील काहीजणांनी उठवल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्या मुलींने तब्बल 48 जणांची नावे सांगितली आहेत. यामुळे गुहागर पोलिसांजवळ या 48 जणांची यादीही तयार झाली असून त्या 48 जणांचे काय झाले, अशी जोरदार चर्चाही सध्या गुहागर तालुक्यात सुरू आहे.