इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील एका खासगी रुग्णालयात विष प्राशन केलेल्या यड्राव ( ता. शिरोळ ) येथील एका युवकाला उपचाराकरीता शनिवारी दुपारी दाखल केले आहे. मारुती ( संपूर्ण नाव समजू शकले नाही ) असे त्यांचे नाव आहे. त्याने राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्याची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याने विषारी औषध प्राशन का केले. याचे नेमके कारण समजू शकले नाही.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….