वार्ताहर/ यमकनमर्डी
ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून 22 आणि 27 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांना कागदपत्रे जुळविण्यासह जोरदार तयारी चालविली आहे. दरम्यान, गुरुवारी यमकनमर्डी मतदारसंघाच्या व्याप्तितील अनेक ग्राम पंचायतीसाठी शेकडो जण अर्ज दाखल केला आहे.
यमकनमर्डी ग्राम पंचायतीतील 25 पदांसाठी 63 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हंचिनाळ पंचायतीच्या 15 जागांसाठी 45 अर्ज, हेब्बाळ ग्राम पंचायतीच्या 17 जागांसाठी 14 अर्ज, उळ्ळागड्डी-खानापूर येथे 19 जागांसाठी 14 अर्ज, गोटूर ग्राम पंचायतीच्या 14 जागांसाठी तब्बल 47 अर्ज, कफचरी ग्राम पंचायतीच्या 19 जागांसाठी 57, मणगुत्ती ग्राम पंचायतीच्या 28 जागांसाठी गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 48 उमेदवारी आपला अर्ज भरला आहे. त्यानुसार शुक्रवारीही आणखी काही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.