इराणी टोळी पुन्हा सक्रिय : परिसरात भीतीचे वातावरण : नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
यमनापूर येथील एका होलसेल दूध-दही डेअरी व्यापाऱयाला मंगळवारी इराणी टोळीच्या चौकडीने दिवसाढवळय़ा अगदी नाटय़मयरीत्या 17 हजार रुपयांना लुटल्यामुळे यमनापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित पोलीस खात्याने या टोळीतील म्होरक्मयांचा तपास लावून त्यांना जेरबंद करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. किरण सिद्राय पाटील, रा. शिवाजी चौक, यमनापूर असे होलसेल दूध डेअरी व्यापाऱयाचे नाव आहे.
किरण पाटील हे समृद्धी दूध डेअरीचे होलसेल विपेते आहेत. मंगळवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नंबर प्लेट नसलेल्या कारमधून चार इराणी यमनापूर येथील शिवाजी चौकात आले. त्यावेळी किरण पाटील यांचे दुकान बंद होते. परंतु, एका इराणीने दुकानचे शटर स्वतः उघडून तो आत आला. यावेळी त्याच्याबरोबर इराणी महिलासुद्धा होती. यावेळी किरण व त्यांची पत्नी, मुलगा व मुलगीही झोपले होते. आपल्या दुकानात परप्रांतीय गोरे लोक आल्यामुळे त्यांना थोडे कुतूहल वाटले. यावेळी त्यांनी दूध पाकिटाची मागणी केली. ते इंग्लीशमधून बोलत होते. त्यांनी दीड लिटर दूध पाकिटाची मागणी केल्यावर किरणच्या मुलाने त्यांना दूध पाकीट दिल्यावर त्यांनी 350 रुपये दिले. यावेळी दुधाचे 75 रुपये घेऊन बाकीचे पैसे परत केले.
त्यानंतर त्या गोऱया माणसाने किरणच्या पत्नीला दोन हजार रुपयांची भारतीय नोट व दहा रुपयांची नोट कशी असते ती आम्हाला जरा दाखवा, असे म्हटल्यावर कुतूहलाने किरणच्या पत्नीने तिजोरीमधील दोन हजार रुपयांची व दहा रुपयांची नोट दाखविण्यासाठी तिजोरी उघडली. यावेळी तो गोरा माणूस किरणच्या पत्नीच्या मागेच उभा होता. इकडे त्या गोऱया बाईने त्यांच्या मुलाला काहीतरी विचारत त्यांचे लक्ष आपल्याकडे विचलित केले होते.
मंगळवारी झालेल्या व्यापाराचे 27 हजार रुपये तिजोरीमध्ये होते. बंडल स्वरुपात दोन हजार व पाचशेच्या नोटा होत्या. त्यांना दाखविण्यासाठी नोटांचा बंडल बाहेर काढताच गोऱया माणसाने संपूर्ण 27 हजार रुपयांचा बंडल किरणच्या पत्नीकडून हिसकावून घेतला तोच किरणची पत्नी ओरडली. त्याक्षणी झोपलेल्या किरणने गोऱयाकडील 27 हजारांचा बंडल हिसकावून घेतला. पैसे तिजोरीत ठेवून त्यांना दुकानातून बाहेर जाण्यासाठी किरणने दरडावले. तोच त्यांनी दुकानाबाहेर येऊन कारगाडीतून पोबारा केला. त्यानंतर किरणच्या पत्नीने पैसे सुरक्षित आहेत की नाहीत, याची पडताळणी केली असता त्यातील 17 हजार रुपये त्या गोऱयाने हातचलाखीने घेऊन लुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर गावातील नागरिक जमा झाले. परंतु, तोपर्यंत ते गोरे पसार झाले होते.
नंबरप्लेट नसलेली कारगाडी
इराणींनी आणलेल्या कारला नंबर प्लेट नव्हती. मात्र, गाडीच्या समोरील बाजूवर अरेबियन असे इंग्रजीमध्ये लिहिलेली पट्टी होती, असे किरणच्या मुलाने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सहा महिन्यांपूर्वीसुद्धा अनुभव
सहा महिन्यांपूर्वीसुद्धा एक इराणी गोरा दोन हजार रुपयांची भारतीय चलनातील नोट दाखव म्हणून किरण पाटील यांच्याकडे आला होता. यावेळी दूध विक्रीतून मिळालेले पैसे पिशवीत होते. दोन हजार रुपयांची नोट दाखविण्यासाठी पिशवीची चेन उघडली असता हातचलाखीने हाताला लागतील तेवढे पैसे त्याने उचलले होते. त्यावेळी हिसका देऊन त्यांना हाकलून दिल्याचेही किरण पाटील यांनी सांगितले.
नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज
व्यावसायिक व इतर नागरिकांनी गोरे लोक आले असता त्यांच्याकडे कुतूहलाने न पाहता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आपण भारतीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आल्याचे भासवून यमनापूरमधील प्रकाराप्रमाणे लुटण्यासाठी त्यांची कला धुडकावून लावण्यासाठी नागरिकांनी या गोऱया नागरिकांपासून सतर्क राहण्याची गरज आहे.
माळमारुती पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.