बेळगाव / प्रतिनिधी
यमुनाक्का महिला पंत भक्त मंडळातर्फे समादेवी गल्लीतील पंतवाडय़ात दीपोत्सव पार पडला. यानिमित्ताने भजन व आरती कार्यक्रमही झाला. यावेळी मंदिराचा सर्व परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा किल्लेकर, शैलजा कुलकर्णी, तारा चव्हाण, शांता जानकुचे, अरुणा शिंदे, सुधा शिरोडकर, सुरेखा जांबोटकर, मनीषा पावशे, मंजुषा पाटील, सुष्मा सायनाक, नीता पाटील आदींसह सदस्या उपस्थित होत्या.