प्रतिनिधी / बेळगाव
हेस्कॉमचा गलथान कारभार सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे. यरमाळ रोड, वडगाव येथे विद्युत खांबाला जोडण्यात आलेल्या डीपीची वाहिनी पूर्णपणे जीर्ण झाली असून, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शॉक लागण्याची शक्मयता आहे. त्यामुळे ही विद्युतवाहिनी त्वरित बदलावी, अशी मागणी रहिवाशांमधून केली जात आहे. विद्युत खांबांवर बसविण्यात आलेल्या डीपी खुल्या असल्याने त्या धोकादायक ठरत आहेत. त्याचसोबत त्यांना जोडण्यात आलेल्या विद्युत वाहिन्याही जीर्ण झाल्या आहेत. पावसात त्यामध्ये पाणी शिरून मोठा अनर्थ घडण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. जमिनीपासून डीपीजवळ असल्याने एखाद्याचा स्पर्श झाल्यास जीवाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे हा धोका वेळीच ओळखून डीपी व विद्युतवाहिनी बदलावी, अशी मागणी होत आहे.