वार्ताहर / बाळेकुंद्री
कर्नाटक-महाराष्ट्र व गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती डोंगरावर सोमवारी श्रीगणेश-गौरी पूजा व रेणुकादेवीला कंकण मंगळसूत्र धारणोत्सवाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी, मंदिराचे अधिकारीवर्ग, मठाचे स्वामी, पुजारीवर्ग यांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पाडला.
मंगळवार दि. 27 एप्रिल रोजी दवण्याची पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार, अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर, मंदिराचे वरिष्ठ अधिकारी रवि कोटारगस्ती, सीपीआय मंजुनाथ नडविनमनी, नागरन्ना चोळीन, अरविंद माळगे, अन्नपूर्णा तेलगी, मुख्य अभियंते एम. व्ही, मुळळूर, डी. आर. चव्हाण, अल्लमप्रभू प्रभूनवर, परसगौड संधीमनी, पुजारी यडूरय्या यांच्या उपस्थितीत वरील धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कोरोनामुळे भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.