भाविकांची होणार सोय : 17 मार्चपासून सुविधा
प्रतिनिधी/ बेळगाव
पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी सोडण्यात आलेल्या यशवंतपूर-पंढरपूर या साप्ताहिक रेल्वेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसला आणखी एक स्लीपर कोच जोडण्याचा निर्णय नैर्त्रुत्य रेल्वेने घेतला आहे. 17 मार्चपासून हा जादा डबा जोडला जाणार असल्याने पंढरपूरला जाणाऱया भाविकांची सोय होणार आहे.
यशवंतपूर येथून गुरुवारी सायंकाळी 7 वा. निघालेली एक्स्प्रेस शुक्रवारी पहाटे 5.10 वा. बेळगावला तर शुक्रवारी दुपारी 11.25 वा. पंढरपूरला पोहोचते. शुक्रवारी दुपारी 2.35 वा. पंढरपूर येथून निघालेली एक्स्प्रेस सायंकाळी 6.50 वा. बेळगावला तर दुसऱया दिवशी पहाटे 6 वा. यशवंतपूरला येथे पोहोचते.